पेणः प्रतिनिधी
पेण शहरात होणारी जनगणना ही शहराच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांनी जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रीतम पाटील यांनी केले आहे.
जनगणनेमुळे शहराची अचूक लोकसंख्या समोर येणार असून त्याआधारे शासनाकडून विविध विकासकामे, पायाभूत सुविधा आणि निधीचे नियोजन केले जाते. चुकीची किंवा अपुरी लोकसंख्या नोंद झाल्यास भविष्यात शहराच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, जनगणनेदरम्यान माहिती दिल्याने कोणत्याही शासकीय योजना किंवा लाभ बंद होणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता योग्य व अचूक माहिती द्यावी आणि जनगणना अधिकाऱ्यांना मनापासून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी केले आहे.
