रमजान ईद उत्साहात साजरा

State

पेण ः प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सुर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात. या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.
पेण शहरात वरच्या मोहल्यात व खालच्या कसाई मोहल्यात ईदीची नमाज पठण केली. सकाळी आठच्या सुमारास वरच्या मोहल्या नमाज झाली तर कसाई मोहल्यात साडेआठ वाजता नमाज पठण झाली. त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकाला भेटून शुभेच्छा दिल्या तर पेण पोलीस ठाणे आणि पेण शांतता कमिटी मार्फत मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे स्वतः हजर होते. त्याचबरोबर शांतता कमिटीचे सदस्य सुद्धा उपस्थित होते.