बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचे पुरस्कार जाहीर

State

पेणः प्रतिनिधी
सोबती संघटना व बापूसाहेब नेने फाउंडेशन पेण मार्फत  ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत  विविध क्षेत्रात काम करणार्‍या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी सोबती मार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या पोलिस निरी्‌क्षक वडखळ प्रसाद दशरथ पांढरे, कला क्षेत्रात काम करणारे राजेंद्रनाथ मारूती जोशी, क्रिडा क्षेत्रात काम करणारी ऋणाली प्रदिप मोकल शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे गुरुकुल शिक्षण संस्था वडखळ, वैद्यकिय क्षेत्र डॉ. सोनाली मनिष वनगे, तर बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सौ,मानसी मच्छिद्र केदारे शाळा वावोशी, श्रीमती मनिषा अमृत दळ्वी शाळा डोलवी, श्री. किशोर पाडुरंग पाटील शाळा अंबिवली, सौ. सिमा रूपेश पाटील अंगणवाडी शाळा वडखळ, अदिंचा समावेश आहे. हा पुरस्कार सोहळा 14 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता भाऊ साहेब नेने महाविदयालयाच्या सांस्कृतिक ओपन हॉलमध्ये प्रमुख अतिथी राधीकाताई घोरफडे पुणे, ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने व ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सोबती संघटनेचे अध्यक्ष ऍड. मंगेश नेने, सचिव डॉ.ऍड.निता कदम, खजिनदार निलेश म्हात्रे उपस्थित राहणार असून पेण शहरातील प्रतिष्ठीत मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत.