पेणमध्ये 22 एप्रिलला बैठक
पेण ः प्रतिनिधी
रायगड जिल्हयातील 810 ग्रामपंचायतींसाठी 2025-2030 साठी तालुकानिहाय सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करून अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकानिहाय सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी प्राधिकृत व नियुक्ती करून अणि सरपंच आरक्षणाची तालुक्यात सभा घेण्यासाठी तारीख निश्चितीची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
पेण 22 एप्रिल, अलिबाग 22 एप्रिल, मुरुड 23 एप्रिल, पनवेल 22 एप्रिल, उरण 23 एप्रिल, कर्जत 22 एप्रिल, खालापूर 23 एप्रिल, रोहा 22 एप्रिल, सुधागड 23 एप्रिल, माणगाव 22 एप्रिल, तळा 23 एप्रिल, महाड 23 एप्रिल, पोलादपूर 24 एप्रिल, श्रीवर्धन 22 एप्रिल, म्हसळा 23 एप्रिल अशा तारखा आहेत.
उपविभागीय अधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 पोट नियम (4) (5) (6) नुसार त्या त्या ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या, मागील आरक्षण यांचा सखोल अभ्यास करून अचूक आरक्षण निश्चित करावे. सरपंच आरक्षणाची सभा संबंधित तालुक्यात घेउन कार्यवाही पूर्ण करावी. असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
पेण येथे प्रविण पवार उपविभागीय अधिकारी पेण-सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 22 एप्रिल 2025 रोजी सभेचे आयोजन करणार आहेत. पेण तालुक्यात एकूण 64 ग्रामपंचायती असून यामध्ये सर्वसाधरण खूला 16, सर्वसाधारण महिला 16, नागरिकांचा मागास प्रर्वग खूला 8, महिला 9, अनुसूचित जमाती खूला 7 महिला 7, अनुसूचित जाती खूला 1, महिला 0 असे आरक्षण असणार आहे. पेणच्या सरपंच पदाचे भवितव्य 22 एप्रिल 2025 रोजी समजणार आहे. त्यामुळे कुणाच्या वाटयाला हसू, आणि कुणाच्या वाटयाला असू हे समजणार आहे.