सुसज्ज कबड्डी मैदान तयार करून देणारः भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील

State

कबड्डी पट्‌टू विकी ठाकूर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

पेणःप्रतिनिधी
रायगड जिल्हातील सुप्रसिध्द कबड्डी पट्‌टू विकी ठाकूर तथा पुष्पा यांचा वाढदिवस मोठया जल्लोषात त्यांच्या जन्मभुमित म्हणजेच पाटणेश्र्वर येथे साजरा करण्यात आला. यावेळी भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी विकीचा सामना पेण  फेस्टिवलमध्ये पाहिला आणि नकळत कबड्डी खेळाच्या प्रेमात पडलो. माझ्या आयुष्यातील तो पहिला सामना होता की, ज्यामध्ये चुरस एवढी निर्माण झाली होती की, मिनिटा मिनिटाला सामन्याचा निकाल बदलत होता. परंतु विकीच्या खेळाणे तो सामना शेवटच्या सर्विसने पाटणेश्र्वरच्या बाजूने झुकला. तसा मी क्रिकेट प्रेमी आहे परंतु कबड्डीचा थरार काय आहे ते मी त्या दिवशी स्वतःच्या डोळयांनी पाहिला आणि कबड्डीच्या प्रेमात पडलो. माझी इच्छा आहे की, पाटणेश्र्वर गावात जर जागा उपलब्ध झाल्यास मी निधी वापरून सुसज्ज मैदान तयार करून देईन. तुम्ही जागा उपलब्ध करून दया बाकी खर्चाची तरतुद मी करेन. तसेच सदैव पाटणेश्र्वर संघाच्या बरोबर राहिन असा शब्द दिला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश पाटील यांनी केले. तर मा.सरपंच नरेंद्र पाटील (भाई), उपसरपंच विकास पाटील, नगरसेवक संतोष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विकी ठाकूर रायगड जिल्हयातील कबड्डी विश्र्वातला एक उभरता तारा असून शांत व शिस्तप्रिय खेळाडू म्हणून त्याला जिल्हयात ओळखतात. तथा त्याच्या हटके लुक मुळे पुष्पा या नावाने देखील त्याला संबोधतात. त्याने आपल्या चढाईच्या जोरावर अनेक कबड्डीची मैदान गाजवली आहेत. तोे शिवशंभो पाटणेश्र्वर या संघाचे प्रतिनिधीत्व करतो. त्याच्या या वाढदिवसासाठी भाजपचे उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील, शिवसेना शहर प्रमुख (शिंदे गट) दिनेश पाटील, विकीचे वडील परशुराम ठाकूर, मा.सरपंच भाई पाटील, उपसरपंच विकास पाटील, मा.उपसरपंच मंगेश पाटील, उपसरपंच संजय म्हात्रे, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पांडूरंग पाटील, मा.सैनिक प्रल्हाद पाटील, समाज सेवक लल्ला भाई आणि नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह क्रिडा विश्र्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी केक कापून मोठया उत्साहात वाढदिवस कार्यक्रम संपन्न झाला.