पेणःप्रतिनिधी
पेण तालुका स्तरीय क्रिडा व व्यक्तीमत्त्व स्पर्धा 2 जानेवारी व 3 जानेवारी रोजी डॉ.बाबा साहेब आंबेडकर नगरपालिका शाळा क्र. 4 या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिध्द उद्योजक राजु पिचिका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गट शिक्षण अधिकारी अधिकारी अरूणा देवी मोरे, सर्व केंद्र प्रमुख, तालुक्यातील शिक्षक वृंद हजर होते.
दोन दिवस चालणार्या या स्पर्धा मध्ये बेचकिने नेम धरणे, दोरी उडी, लगोरी, सांगीक पारंपारिक नृत्य, समुह गीत गायन, पथ नाटय, मातीचे शिल्प तयार करणे, अदि स्पर्धा झाल्या. या स्पर्धामध्ये बेचकीने नेम धरणे छोटा गट प्रथम क्रमांक रोहन वाघमारे वडखळ, द्वितीय क्रमांक अनिकेत वाघमारे पाबळ, तृतीय क्रमांक स्वयंम नाईक आमटेम मोठा गट प्रथम क्रमांक दयानंद पारधी कामार्ली, द्वितीय क्रमांक विशाल वाघमारे जिते, तृतीय क्रमांक रोहीत लेंडे वरसई. दोरी उडी मुली छोटा गट प्रथम क्रमांक सोनाली शिद गागोदे, द्वितीय क्रमांक आदिती पारधी वरसई, तृतीय क्रमांक सान्वी घरत जोहे, मोठा गट मयुरी म्हात्रे वाशी, द्वितीय क्रमांक नुपूर शिवकर कासू, तृतीय क्रमांक मानसी पाटील जिते, लगोरी छोटा गट प्रथम क्रमांक शिहु संघ, द्वितीय क्रमांक कोपर संघ, तृतीय क्रमांक खरोशी संघ, मोठा गट प्रथम क्रमांक खरोशी संघ, द्वितीय क्रमांक उंबर्डे संघ, तृतीय क्रमांक वडखळ संघ, लंगडी छोटा गट प्रथम क्रमांक कामार्ली संघ, द्वितीय क्रमांक कोपर संघ, तृतीय क्रमांक आंबेघर संघ, मोठा गट प्रथम क्रमांक शिहु संघ, द्वितीय क्रमांक खरोशी संघ, तृतीय क्रमांक आमटेम संघ तसेच व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये सांघिक पारंपारिक नृत्य स्पर्धा छोटा गट प्रथम क्रमांक उंबर्डे संघ, द्वितीय क्रमांक खरोशी संघ, तृतीय क्रमांक आमटेम संघ, मोठा गट प्रथम क्रमांक उंबर्डे संघ, द्वितीय क्रमांक खरोशी संघ, तृतीय क्रमांक कासू संघ, समुहगीत गायन स्पर्धा छोटा गट प्रथम क्रमांक शिहू संघ, द्वितीय क्रमांक खरोशी संघ, तृतीय क्रमांक उंबर्डे संघ, मोठा गट प्रथम क्रमांक खरोशी संघ, द्वितीय क्रमांक जोहे संघ, तृतीय क्रमांक वाशी संघ, पथनाटय स्पर्धा छोटा गट प्रथम क्रमांक वाशी संघ, द्वितीय क्रमांक उंबर्डे संघ, तृतीय क्रमांक आमटेम संघ, मोठा गट प्रथम क्रमांक गाागोदे संघ, द्वितीय क्रमांक आंबेघर संघ, तृतीय क्रमांक पाबळ संघ, मातीचे शिल्प तयार करणे छोटा गट प्रथम क्रमांक जोहे, द्वितीय क्रमांक गागोदे, तृतीय क्रमांक उंबर्डे, मोठा गट प्रथम क्रमांक कामार्ली, द्वितीय क्रमांक उंबर्डे, तृतीय क्रमांक जिते असे विजेते असून या मधील सर्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी व संघ जिल्हा स्तरावर पेण तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.