देवळी क्रॉसिंग येथे महामार्ग क्रमांक 66 तणझ (व्हेईकल अंडर पास) बांधून देणार
पेण ः प्रतिनिधी
एक वर्षांपूर्वी आलेल्या सीएनजी पंपामुळे देवळी व जुई अब्बास या दोन गावांच्या रस्ता क्रॉसिंगला महामार्ग क्रमांक 66 च्या वरिष्ठ अधिकार्यांनी केलेल्या विरोधामुळे या दोन गावात फार मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे काल-परवा आलेला सीएनजी पंप मोठा की वाडवलापासून येथे असणारी गावे मोठी हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वतःच्या मनासारखे अडवणूक धोरण ठरविणार्या महामार्ग क्रमांक 66 च्या अधिकार्यांना जब विचारण्यासाठी देवळी व जुई अब्बास गावांनी 15 ऑगस्ट रोजी बायका मुलांसह येऊन रस्त्यावर ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला आहे . संदर्भात नुकतीच पेण प्रांत कार्यालय येथे देवळी व महामार्ग क्रमांक 66 चे वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत मीटिंग झाली या मीटिंगमध्ये खासदार धैर्यशील पाटील यांनी दूरध्वनीवरून भाग्य महामार्ग क्रमांक 66 चे वरिष्ठ अधिकारी कोटकर व उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा करण्यास सांगितले होते.
त्याप्रमाणे दिनांक 18 जुलै रोजी हे दोन्ही अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन त्यांनी पाहणी केली यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर खारपले ग्रामपंचायतीचे उपसरपंच पांडुरंग तुरे सदस्य किरण तुरे तसेच सुभाष तुरे, रामचंद्र तांडेल, विलास शिवकर, प्रभाकर तांडेल, जगन्नाथ तांडेल, सुधाकर तुरे तसेच रामचंद्र बुधाजी म्हात्रे, संतोष म्हात्रे, हरिश्चंद्र तांडेल, रमाकांत ठाकूर हे प्रमुख कार्यकर्ते व दोन्ही गावचे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी पाहणीसाठी आलेल्या अधिकार्यांना रस्ता क्रॉसिंग मुळे निर्माण झालेल्या समस्यांची कल्पना दिली व लोकांच्या तीव्र भावना निदर्शनात आणल्या एवढेच नव्हे तर यावेळी सीएनजी पंपाचे कार्यवाह मोहन शिंदे यांना उपस्थित केले व याच महामार्गाच्या अधिकार्यांनी येथे असणार्या नाल्यावर जबरदस्ती काम करायला लावल्याचे दाखवून दिले त्यामुळे आज हेच अधिकारी याच सीएनजी पंपाच्या नावाने अडकाटी करीत असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी ग्रामस्थांच्या उग्र भावना लक्षात घेऊन महामार्ग क्रमांक 66 च्या अधिकार्यांनी येथे तणझ (व्हेईकल अंडर पास) लावण्यात येईल तोपर्यंत येथील गरज लक्षात घेऊन सध्या असलेली क्रॉसिंग काढणार नाही असे आश्वासन दिले. मात्र यासाठी ग्रामस्थांनी अर्ज करावा असे सांगितले त्यावेळी अरुण शिवकर यांनी राज्य मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना ग्रामस्थांचे निवेदन दिले जाणार असल्याचे सांगितले
त्यानंतर सीएनजी पंप मालकाने ग्रामस्थांनी सूचना केल्याप्रमाणे याच क्रॉसिंग वरून आत येणार्या वाहनांचा मार्ग बदलण्यासाठी ग्रील लावण्याचे कबूल केले त्यामुळे अपघात होण्याचा धोका टाळला आहे
