पेण ः प्रतिनिधी
पेण येथील उदयोजक तथा हॉटेल व्यवसायिक सुरेश शेठ उर्फ सुर्यकांत जोमा पाटील हे अवैधरित्या सावकारी करत असल्याचा आरोप त्यांची सुन प्रज्ञा हिने पत्रकार परिषद घेउन 2 महिन्यापूर्वी सांगितले होते. परंतू, या बाबीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. मात्र 18 जुलै रोजी एलसीपी कडून सुर्यकांत पाटील आणि त्यांचा मुलगा भरत पाटील यांच्या गोमांतक हॉटेल व आमंत्रण सोसायटीचा प्लॅट नंबर 301, 302 यावर छाप टाकला असता, या छाप्यामध्ये पोलीसांच्या हाती विविध बँकांचे रक्कमा भरलेले व तसेच कोरे धनादेश विविध मालमत्तांचे करारनामे , वचन पावत्या, खरेदीखत, गावनकाशे, यासंह अनेक अक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. पूर्ण झाडाझडती झाल्यानंतर पोलीसांनी सर्व माहिती सहायक निबंधक सहकार सुभाष काळे यांच्याकडे दिली होती. या सर्व बाबींची सुभाष काळे यांनी पडताळणी करुन 21 जुलै रोजी सायंकाळी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. तो गुन्हा 22 जुलै रोजी सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी दाखल झाला. पूर्ण रात्र या गुन्हयाची नोंद होत होती. यावरुन पोलीसांच्या हाती आणि सहकार निबंधकांच्या हाती लागलेली माहिती अथवा कागदपत्र केवढे असतील याविषयी अंदाज ही बांधता येणार नाही. सहायक निबंधक सुभाष काळे यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार सुर्यकांत जोमा पाटील व भरत सुर्यकांत पाटील यांच्याविरुध्द वेगवेगळे दोन गुन्हे नोंदले गेले. यामध्ये 1.सुर्यकांत जोमा पाटील पेण पोलीस ठाणे गुन्हा रजि. 226/2024 भा.न्या.स.क 85,75(1),115(2),352,351(2),(3),3(5) 2. पेण पोलीस ठाणे गुन्हा रजि. 135/2023 भा.द.वि.कलम 376,376 (2),(एन),354,323,504,506,34 3. पेण पोलीस ठाणे गुन्हा रजि. 53/2023 भा.द.वि.कलम 143,147,324,323,504,506
2. भरत सुर्यकांत पाटील 1. पेण पोलीस ठाणे गुन्हा रजि. 226/2024 भा.न्या.स.क. 85,75(1),115(2),352,351 (2), (3),3(5), 2. पेण पोलीस ठाणे गुन्हा रजि. 53/2023 भा.द.वि.कलम 143,147,324,323,504,506 चा समावेश आहे. एकंदरीत सफेद कपडयांच्या आतून समाजसेवा करण्याचा पांघरूण घेतलेल्या सुर्यकांत जोमा पाटील व भरत सुर्यकांत पाटील यांचा खरा चेहरा सहकार खात्याने गुन्हा नोंदल्याने समोर आला आहे. या गुन्हयाचा अधिक तपास जिल्हा अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत हे करत आहेत. मात्र या गुन्हयामध्ये आरोपींना अटक झाली नाही. परंतू आरोपींना अटक होईल की नाही याबाबत निश्चित माहिती नाही.
