कांदळे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचे लोकार्पण
पेण : प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत कांदळेच्या नुतन कार्यालयाचे लोकार्पण आणि जलशुध्दी करण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी कांदळे गावचे सरपंच मुरलीधर भोईर यांचे गौरव करताना सांगितले की, तालुक्यात वोटावर मोजणारे जे सरपंच आहेत त्यांना विकासाची दृष्टी आहे. त्यामध्ये मुरलीधर भोईर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आपल्या सरपंच पदाच्या कारर्कीदीत ग्रुप ग्रामपंचायत कांदळेमध्ये अनेक वैशिष्टपूर्ण कामे केली. आणि गावाचा विकास केला. या गावाची एक समस्या जी पाण्याच्या निचऱ्याची आहे त्यावावत सतत अधिकारी वर्गाचा पाठपुरावा मी करत आहे ती ही समस्या सोडवली जाईल असे सांगून दिपावली व भाउविजेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरंपच मुरलीधर भोईर यांनी प्रास्ताविकात २०१९ ते २०२५ या काळात कांदळे, कांदळेपाडा, उचेडे या गांवामध्ये कोणकोणती विकास काम केली. यावावत अवर्जून उल्लेख करत ज्यांनी ज्यांनी विकास निधीसाठी मदत केली त्यांचे आभार मानले. तसेच यावेळी मा.जिल्हा परिषद सभापती डी.वी.पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरीओम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व प्रथम जल शुध्दिकीकरण केंद्राचे कृषी उत्पन्न वाजार समितीचे सभापती महादु मानकर यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण खासदास धैर्यशील पाटील, पेण नगरपालिका गटनेते अनिरूध्द पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, सरपंच मुरलीधर भोईर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ देउन करण्यात आले. यामध्ये खासदार धैर्यशील पाटील, गटनेते अनिरूध्द पाटील, जिल्हा परिषद मा. सभापती डी.वी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, कृषी उत्पन्न वाजार समितीचे सभापती महादू मानकर, वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती परशूराम पाटील, वडखळ ग्रामपंचायतीचे मा. सरपंच योगेश पाटील, कृषी उत्पन्न वाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील, यांच्यासह अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, विवेक म्हात्रे, अंतोरा सरपंच अमित पाटील, आंविवली सरपंच प्रशांत पाटील, मळेघर सरपंच मच्छिंद्र पाटील, कृषी उत्पन्न वाजार समितीचे मा. सभापती प्रफुल्ल म्हात्रे, नगरसेवक संतोष पाटील, विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे, प्रशासक गणपत पवार, अदींसह मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग व ग्रामस्थ हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन हर्षल लांगी यांनी केले.
