पेण :- प्रतिनिधी
आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींचा विचार करून भाजप पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे आणि विवेक म्हात्रे यांनी पेण तालुक्यातील युवा मोर्चाच्या नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वरिष्ठांच्या आदेशाने नुकत्याच जाहिर केल्या. त्यांना नियुक्तीपत्र जिल्हा अध्यक्ष रायगड तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते त्यांच्या राहत्या स्नेहसागर बंगल्यावर देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर, भाजपचे पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख मंगेश दळवी, कांदळे सरपंच मुरलीधर भोईर, भाजप युवा मोर्चा उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील बोरगाव मा. सरपंच सुधीर पाटील, अंतोरा मा. सरपंच अमित पाटील, अंबिवली मा. सरपंच प्रशांत पाटील, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य अमोल घोटणे, यांच्यासह मोठ्या संख्येने युवा पदाधिकारी हजर होते. यावेळी भाजपा युवा मोर्चा पेण तालुका पश्चिम मंडळ कार्यकारणी कोषाध्यक्ष महेश ठाकूर काळेश्री, सरचिटणीस समीर ठाकूर दीव, उपाध्यक्ष प्रसाद पाटील काळेश्री, उपाध्यक्ष स्वप्निल म्हात्रे दीव, चिटणीस प्रशांत थवई वाशी तर भाजपा युवा मोर्चा पेण तालुका पूर्व मंडळ कार्यकारणी सरचिटणीस निशाकर कृष्णा घरत खारपाडा, अजिंक्य नितीन पाटील वाकरूळ, गणेश लक्ष्मण मनवे वरप, तसेच उपाध्यक्ष आकाश सटू पाटील कामार्ली, हरेश सुदाम पाटील बोरगाव, आदित्य प्रकाश पाटील इरवाडी व चिटणीस सचिन अशोक सावंत मालदेव, समिर परशुराम पाटील कांदळेपाडा अदींना नियुक्तपत्र देऊन कामाला लागण्याचे आदेश खासदार धैर्यशील पाटील यांनी दिले आहे.
यावेळी धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूकीमध्ये विरोधकांना आपल्याला व्हाईट वॉश दयायचा आहे. त्यामुळे तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचुन पतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची देशाप्रती असलेले अभिमान आणि देशा प्रती असलेला प्रेम सर्वांना समजून सांगून आपल्या सरकारने घेतलेले धाडसी निर्णय हे ही मतदारांना सांगा.
