पालीचा बदला पेणमध्ये घेतला :- आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया

Political

पेण आज भाजप उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी भाजपचे कमळ चिखलात गाडत हातात धनुष्य बाण घेतला आणि वडखळ गटातून जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत भरला त्यावेळी महेंद्र दळवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुधागडमध्ये आमची सिटिंग मेबर रवी देशमुख यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला ही भाजपची कटु निती असेल, त्यांनी प्रवेश करुन घेतला आज मिलिंदसारखा योध्दा मी माझ्या पक्षामध्ये घेऊन उमेदवारी दिली आहे. सिन्यारिटीनुसार मिलिंद पाटील यांना वडखळ गटातून उमेदवारी मिळणे गरजेची होती परंतू असे झाले नाही माझे आणि मिलिंदचे असलेले संबंध आणि आमच्या पेण मधील कार्यकर्त्यांची इच्छेनुसार आज वडखळ गटातून उमेदवारी जाहीर करुन उमेदवारी अर्ज भरला आहे. पालीचा बदला पेणमध्ये काढला आहे. मिलिंद पाटील हे चांगल्या मताधिक्याने निवडुन येतील अशी खात्री आहे. आणि पेणचे नेतृत्व शिवतीर्थावर करतील. आणि असा योध्दा जिल्हा परिषदेमध्ये हवा आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. पेणच्या जनतेने त्याच्यावर खूप प्रेम केले आहे. असेच प्रेम करुन मतरुपी आशिर्वाद येत्या ५ तारखेला मतदान पेटीमध्ये देतील अशी अपेक्षा आहे.

यावेळी मिलिंद पाटील यांनी बोलताना सांगितले की, मी विकासाच्या मुद्दयावर मतदारांच्या सामोरे जात असून, खारेपाटामध्ये भेडसावणारा पाणी प्रश्न, रस्ते काही मुलभूत गरजा या बाबत असलेली उदासिनता व खारेपाटाचा खुंटलेला विकास हे मुद्दे घेऊन मी मतदारांसमोर जाणार आहे. मतदार सुज्ञ आहेत ते मला स्विकारणार याबाबत मला तीळ मात्र ही शंका नाही. त्यामुळे खारेपाटातील प्रश्न हे खारेपाटातीलच माणुस सोडवेल असे माझे प्रामाणिक मत आहे.