पेण ः प्रतिनिधी
बोरी खारेपाट विभागातील शिर्की गावचे सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील आणि ग्रामस्थांनी नुकतीच पत्रकार परिषद घेउन ङ्गेज थ्री प्रकल्पाविषयी होणार्या जनसुनावणीला शिर्की ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवत शिर्की गावामध्ये सीएसआर ङ्गंडातून केलेल्या कामांचा पाढाच वाचत सांगितले की, शिर्की गावामध्ये दोन तलावांचे सुशोभिकरण करुन त्यामध्ये पाण्याचा साठा कसा वाढेल आणि त्या पाण्याचा उपयोग शिर्की गावाला कसा होईल यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले तसेच, शैक्षणिकदृष्टया विचार करुन कोएसओ विद्यामंदीर शिर्की चे सुशोभिकरण व संरक्षण भिंत तसेच शिर्की चाळीवर शाळेची प्रशस्त इमारत बांधण्यासाठी निधीची उपलब्धता तसेच स्मशानभुमी नव्याने तीन ठिकाणी बांधून दिले. तर शिर्की गावातील अंतर्गत पाणी पुरवठयासाठी पाईपलाईनला निधी दिली. एक ना अनेक कामं जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर ङ्गंडातून झाल्याचे सांगत महिलावर्गांनी पाण्याची समस्या सोडविल्याने जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाचे आभार मानले. भविष्यात रोजगार हवा असेल तर कंपनी विस्ताराला प्रामाणिक मदत करणे गरजेचे आहे. तसेच यावेळी शेखर पाटील यांनी स्थानिकांना रोजगार मिळण्याबाबत कंपनी प्रशासनाशी चर्चा केल्याची असल्याचे देखील सांगितले व पूर्णताः शिर्की गाव जेएसडब्ल्यू कंपनी विस्ताराला पाठिंबा देत असल्याचे शेवटी सांगितले.
या पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ नागरिक रामनाथ पाटील, धनाजी पाटील, मोतीराम पाटील, अशोक पाटील, अनंत पाटील, अविनाश पाटील, बळवंत गावंड, तर माहिला वर्गामध्ये अंजनी पाटील, भावना पाटील, चांगूणा पाटील, जयश्री तांबटेकर, मिनल गावंड, रसिका पाटील, अर्चना पाटील, अरुणा पाटील, रजनी पाटील, मंजुळा पाटील, नर्मदा पाटील, शुभांगी पाटील, श्र्वेता शिवकर अदिंसह महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
