पेण ः- प्रतिनिधी
गेल पाईप लाईन आउट करण्यासाठी साई दिघाटी रावे भागामध्ये दिनांक 5/3/2025 रोजी गेल पाईप लाईनचे सर्वे करण्यासाठी अधिकारी आले असता संबंधित शेतकर्यांनी कामगार नेते काशिनाथ पाटील यांना बोलवले त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेउन गेल्या आठवडयातच उपोषणाच्या वेळी झालेल्या चर्चेचा खुलासा देत. तातडीने गेल कंपनीचे अधिकारी नार्वेकर यांना सांगितले की, जो पर्यंत प्रांत कार्यलयात ठरल्याप्रमाणे बैठक होत नाही. तोपर्यंत सर्वे आम्ही करु देणार नाही असे सांगून सर्वे करणारे अधिकारी मुरुडकर यांना सर्वे बंद करण्यास सांगितले शेतकर्यांच्या भावनांचा आदर करत अधिकार्यांनी देखील सर्वे बंद केला.
