पेण ः- प्रतिनिधी
गेल्या आठवडयात दुरशेत येथे एका अज्ञात महिलेचे मृतदेह सुटकेसमध्ये आढळलेला होता. त्यावेळी सर्वांना शिना बोरा प्रकरण आठवले होते. कारण अज्ञात महिलेचा खुण सात ते आठ दिवस अगोदर झाल्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे पूर्ण मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत होता अखेर चित्रकारांच्या मदतीने मयत महिलेचा रेखांकित चित्र व काल्पनिक समोर आला आहे.
आठ दिवसापूर्वी दुरशेत गावाच्या हद्दित बाळगंगा नदीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला सुटकेस मध्ये अनोळखी महिलेचे प्रेत सापडले होते. त्याचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय पेण येथे करण्यात आले त्यावेळी या अनोळखी मयत महिलेची माहिती समोर आली होती. अंदाजे वय 25 ते 30 वर्ष, रंग गोरा, उंची अंदाजे 148 से. मि. उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीमध्ये ए असे गोंदलेले तसेच सदर महिलेच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर लाल रंगाची नेलपेंट लावलेली दिसत होती. तसेच केसाला काळया रंगाचा चाप, बोटामध्ये एक अंगठी हातात लाल रंगाची बांगडी, मयत महिलेने परिधान केलेले गाउन असे सर्व ऐवज आढळून आले होते त्यानंतर पोलीसांनी रेखाचित्रकाराला बोलवून घेउन अज्ञात महिलेचे छायाचित्रण काढण्यास सांगितले शेवटी सदरील महिलेचे काल्पनिक व रेखांकित चित्र पोलीसांच्या हाती लागले आहे. छायाचित्रात असलेली महिला कुणाची नातेवाईक अथवा शेजारी असेल तर त्यांनी त्वरीत पेण पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे.