भाजप पेणमध्ये नाटय मानापमान

Political

पेण ः प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष खासदार धैर्यशिल पाटील यांच्या सुचनेनुसार व आमदार रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पेणमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. मात्र आयोजकांमध्ये वैकुंठ पाटील महामंत्री रायगड जिल्हा, मंगेश दळवी जिल्हा उपाध्यक्ष, मिलींद पाटील जिल्हा उपाध्यक्ष यांची नावे हेतुपुरस्तर डावळल्याने पेण शहरात दिवसभर भाजपचा नाटय मानापमान पहायला मिळाला. एकंदरीत गेली दोन ते तीन दिवस भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या नेमनुकी वरून समाज माध्यमांवर तू तू मै मै सुरू आहे. त्याचाच पुढचा अंक तिरंगा रॅलीच्या आयोजकांच्या नावाच्या यादीवरून आज पुन्हा पहायला मिळाला.त्यामुळे कळत नकळत भाजपमध्ये दोन गट कार्यरत आहेत असेच राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी येणार्‍या निवडणूकींच्या पार्श्र्वभूमीवर हे गटातटाचे राजकारण भाजपला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. या विषयी नाराज गटातून पेण मंडळ अध्यक्ष यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली जात असून मुद्दामहुन भाजपमध्ये गटातटाच्या राजकारणाला खतं पाणी घातले जात आहे.