पेणःप्रतिनिधी
एनव्हीजी एज्युकेशन सोसायटीच्या कोनायन्सन स्कूलमध्ये सिबीसी अभ्यासक्रमाच्या कनिष्ठ महाविदयालयाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक शिक्षण महर्षी बापुसाहेब नेने यांच्या हस्ते झाले. साधारणतः सहा वर्षापूर्वी नर्सरी ते दहावी हे वर्ग कोनायन्सन स्कूल ने सुरू केले. सुरूवातीच्या वर्षी 80 विदयार्थ्यांना घेउन सुरू झालेली शाळा अल्पावधीतच पालकांच्या पसंतीला उतरली. त्यामुळे पालकांच्या आग्रहाखातीर एनव्हीजी सोसायटीने कनिष्ठ महाविदयालयाची मान्यता आणून कनिष्ठ महाविदयालयाची सुरूवात आज मोठया धुम धडाक्यात केली.
सर्व प्रथम प्रमुख अतिथी शिक्षण महर्षी बापुसाहेब नेने यांचे स्वागत शाळेच्या बॅड पथकाकडून करण्यात आले. त्यानंतर सरस्वती पुजन, दिप प्रज्वलन आणि नंतर बापुसाहेबांच्या हस्ते फीत कापुन अकरावीच्या वर्गाचे औपचारीक उदघाटन केले. या शिक्षण सोसायटीमध्ये सायन्स, कॉमरर्स, आणि आर्टस या तिन्ही शाखांचे अकरावीचे प्रवेश सुरू झाले आहेत आणि एक तारखेपासून हे कनिष्ठ महाविदयालय सुरू होणार आहे.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पेण एनव्हीजी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाकडून करण्यात आले. त्यावेळी व्यासपिठावर शिक्षणमहर्षी बापुसाहेब नेने, मा.नगराध्यक्षा प्रितम पाटील, बापुसाहेब आठवले, बोरगाव मा.सरपंच नाना म्हाडीक, मा.उपनगराध्यक्ष दिपक गुरव, संचालक मंडळापैकी अध्यक्ष डॉ.मनिष वनगे, उपाध्यक्ष डॉ.सोनाली वनगे, सचिव ऍड. मंगेश नेने, खजिनदार ज्योती गुरव, यांच्यासह मुख्याध्यापिका सुप्रिया वेखंडकर, जमिना शिरपुरवाला, अदी उपस्थित होते. तर यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमिना शिरपुरवाला यांनी केले तर शिक्षण महर्षी बापुसाहेब नेने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठी भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. परंतु त्या बरोबर इंग्रजी शिकणे ही काळाची गरज आहे. आज महाराष्ट्रातून 9 ते 10 टक्के विदयार्थी परदेशात जातात तिथे तर ते मराठी बोलू शकत नाही तिथे इंग्रजीचाच उपयोग होतो. त्यामुळे इंग्रजी माध्यमांची शाळा ही काळाची गरज होउन बसली आहे. तसेच यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, ऍड. मंगेश नेने, डॉ. सोनाली वनगे, डॉ. मनिष वनगे, डॉ.निता कदम, मा.सरपंच नाना महाडीक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. रायगड जिल्हयात प्रथमच सिबीएससी अभ्यास क्रमाचे कनिष्ठ महाविदयालयाची सुरूवात एनव्हीजी एज्युकेशन सोसायटीने केले आहे.
