कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींच्या हस्ते मार्ग पाटीचे अनावरण

Uncategorized

गाव जो पर्यंत राहित तो पर्यंत नाव राहिल:- प्रभाकर म्हात्रे हरि ओम

पेण : प्रतिनिधी

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. जयप्रकाश ठाकूर यांच्या दिव गावातील रस्त्याला कै. जयप्रकाश ठाकूर मार्ग असे नामकरण फलकाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महाद् मानकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जोपर्यंत गाव राहिल तो पर्यंत जयप्रकाश काकांचा नाव राहिल. कारण या दिव गावासाठी सरपंच असताना जो काही कार्य केला आहे तो कार्य आज जेवढ्या व्यक्तांनी अधोरेखीत केले आहे त्यावरून निश्चितच सर्व श्रेष्ठ कार्य आहे. मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यामध्ये काकांचे मोलाचे योगदान आहे. जी काही जिल्हा परिषदच्या प्रचाराची नाव होती त्या नावेचा खऱ्या अर्थाने तांडेल (नावाडी) हे जयप्रकाश ठाकूर काका होते. त्यांच्या मुस्सद्दिगीरीमुळे मला विजय संपादन करण्यास फारसे अडथळे आले नाहीत अशा या मुसद्दी माणसाचे नाव गावातील एका रस्त्याला देउन दिव ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरवच केला आहे असे सांगितले.
यावेळी वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू सटू मानकर, जिल्हा सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरी ओम, उपसभापती नितिन पाटील, युवा मोचचेि तालुकाध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, जिल्हा युवा मोर्चाचे चिटणीस प्रविण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य काशिनाथ पाटील, सुधिर पाटील, सदस्य संदेश ठाकूर, डॉ. परशुराम ठाकूर, शेवंती परशूराम ठाकूर, उपसरपंच सचिन पाटील, बोर्डो मा. सरपंच विजय ठाकूर, अंतोरा सरपंच अमित पाटील, नगरसेवक संतोष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती प्रफुल्ल म्हात्रे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विवेक म्हात्रे, चंद्रकांत पाटील, संदीप म्हात्रे उपसरपंच दीव, मा. सरपंच दीव एकनाथ ठाकूर, मंगल मोकल मा. उपसरपंच दिव, परशुराम ठाकूर, सामाजिक कार्यर्ते संतोष म्हात्रे, संजय ठाकूर मा. सदस्य दीव, उल्हास ठाकूर, बापू ठाकूर, नारायण म्हात्रे, सुशांत म्हात्रे, नरदास ठाकूर, तुळशीदास ठाकूर, प्रभाकर म्हात्रे, मोहन म्हात्रे, सचिन पाटील मा. उपसरपंच, नितीन म्हात्रे, मेघनाथ मोकल, नागेश मोकल बेनवले, गजानान म्हात्रे, सुनील गायकवाड, लक्ष्मण म्हात्रे, नागे पोलीस पाटील, अरुण म्हात्रे, राजेश ठाकूर, परशुराम ठाकूर, सुनील ठाकूर, केतन म्हात्रे, अदींसह मोठ्या संख्येने जयप्रकाश ठाकूर यांचे अनुयायी उपस्थित होते.

सदरील रस्त्याला नाव देण्याची सर्व स्वी कल्पना व कार्यक्रमाची जबाबदारी मा. सरपंच विवेक म्हात्रे यांची होती. सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन समीर जगदीश ठाकूर सरचिटणीस पेण तालुका भाजपा युवा मोर्चा पश्चिम मंडळ यांच्यासोबत विशाल ठाकूर मा. अध्यक्ष कालभैरव क्रीडा मंडळ दीव, विनीत ठाकूर भाजपा बूथ उपाध्यक्ष दीव, महेंद्र ठाकूर, सुजित ठाकूर, आदेश ठाकूर, संदेश ठाकूर, भूषण ठाकूर, जयेश ठाकूर, अतिश ठाकूर, सर्वेश ठाकूर, जय ठाकूर, प्रतीक ठाकूर, दर्शन ठाकूर, दिनेश ठाकूर, शुभम ठाकूर, निशांत गायकवाड, अभिषेक ठाकूर, साहिल ठाकूर, यश ठाकूर, निखिल ठाकूर, देवेंद्र ठाकूर, सुशांत ठाकूर, सतीश ठाकूर यांनी केले.