पेणःप्रतिनिधी
भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा गृह मंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिडशेव्या जयंती निमित्त पुर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात असून, त्यानिमित्त पुर्ण देशात गृह खात्यामार्फत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून पेण पोलीस स्टेशनमार्फत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. हि दौड प्राप्त्त कार्यालय पेण येथून सुरू होउन धरमतर रोड मार्गे कोतवाल चौकात, कोतवाल चौकातून नरदास चाळ, पंकापाटील चौक, कयंडाळ तळा, महाविर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार घालुन पुढे, भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौकात दौड गेली. या चौकात डॉ. बाबा साहेबांच्या देखील अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्या नंतर महात्मा गांधी वाचनालयाच्या पटांगणावर या दौडचे रुपांतर छोटयाखाली सभेत झाले. यावेळी निवासी तहसिलदार प्रसाद कालेकर, यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे महामंत्री वैकुंठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर खासदार धैर्यशील पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून राष्ट्र ीय एकता दिनाचे महत्त्व सांगितले. व यावेळी पोलीस निरिक्षक संदीप बागुल यांनी एकता दौडमध्ये शामिल झालेल्यांचे आभार मानले.
या एकता दौडमध्ये खासदार धैर्यशील पाटील, डी.वाय.एस.पी जालींदर नारकुंद, निवासी तहसिलदार प्रसाद कालेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरीओम, महामंत्री वैकुंठ पाटील, गटनेते अनिरुध्द पाटील, अॅड. मंगेश नेने, नगरसेविका सुनिता जोशी, नगरसेवक शोमेर पेणकर, नगरसेवक संतोष मंदा लक्ष्मण पाटील, मा. नगरसेवक जनार्दन जाधव, परशूराम पाटील, दिनेशशेठ पाटील, स्वप्निल म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे, विवेक म्हात्रे, अमित पाटील, संदेश ठाकूर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व शांतता कमिटी सदस्य, दक्षता कमिती सदस्य, पोलीस पाटील, हेल्थ फिटनेक ग्रुपचे सदस्य, विद्यार्थी आणि पत्रकार शामिल झाले होते. शेवटी राष्ट्रगीताने या एकता दौडची सांगता करण्यात आली.

