पेण प्रतिनिधी
भाजप प्रदेश अध्यक्ष रविद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची भेट नुकतीच राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात झाली त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेतून शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवल्याबाबत गुन गु झाल्याचे राजकीय विश्लेशकांचे म्हणने असून रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्या मधील सत्ता संघर्ष पुर्ण महाराष्ट्राला ज्ञात असून सतत त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतात त्यातच शिवसेना शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या जागा पाडण्यासाठी टोकाचे प्रयत्न करून भाजपच्या विजयी होणाऱ्या जागेवर भाजपचा पराभव केल्याने भाजप देखील दुखावली आहे त्यातच निवडणुकीच्या अगोदर भाजप राष्ट्रवादी यांनी युतीमध्ये निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. त्यानुसार ते पुर्ण रायगड जिल्हयात लढले आणि विजय ही संपादन केला. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीला निवडणुकीच्या दरम्यान सर्व प्रकारे शिंदे गटाने राजकीय त्रास दिल्याने भाजप आणि राष्ट्रवादीचे पक्के ठरले आहे की, सत्तेच्या खुचीं पासुन शिंदे गटाला दुर ठेवणे. आजचे राजकीय बळावळ पाहता शिंदे गट २१, भाजप १५. राष्ट्रवादी १६. शिवसेना उबाठा गट ५, आणि काँग्रेस ३ असे असून सत्ता स्थापन करण्यासाठी ३० जागांची गरज आहे. परंतु राष्ट्रवादी भाजपकडे ३१ जागा असल्याने सत्तेचा मार्ग सुखकर झला आहे त्यातच सुनिल तटकरे आणि रविंद्र चव्हाण यांच्या भेटीत झालेल्या चर्चेनुसार शिदेगटाचा करेक्ट कार्यक्रम उरकुन सत्तेपासुन दुर
ठेवण्याची तयारी केली आहे हे निश्वित झाले असून, कालच गोव्यामध्ये खासदार सुनिल तटकरे, राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, रायगडचे चाणाक्य सतिश धारप, आणि आमदार रविशेठ पाटील यानी एकत्र येऊन सत्तेची गणित मांडली असून, तटकरे चव्हाण भेटीने आखलेला चक्रव्हयु पुढे कार्यन्वित झाला असून, शिंदे गटाला सत्तेपासुन थेट वाहेर ठेवण्याचे मनसुवे तयार झाले आहेत.
