पेणःप्रतिनिधी
पेण तालुक्यातील श्री क्षेत्र पाटणेश्र्वर येथील दिनेश मनिराम म्हात्रे वय वर्ष 42 त्यांचा भाऊ विनायक म्हात्रे यांच्या घरी काल रात्री चोरी झाली असून या बाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले असून याचे सविस्तर वृत्त असे की, दिनेश मनिराम म्हात्रे यांचा छोटा भाऊ विनायक मनिराम म्हात्रे हे बँगलुर येथे कामानिमित्त कुटुंबा समवेत राहत असतात त्यामुळे त्यांच्या घराला लॉक लावलेला असतो. मात्र विनायक यांची आई सुरेखा म्हात्रे या रोज सकाळ संध्याकाळ घरात दिवाबत्ती करून पाटणोली येथील राहत्या घरी परत जातात. रोजच्या प्रमाणे कालही सायंकाळी सातच्या सुमारास दिवाबत्ती करून घरी गेल्या मात्र रोजच्या प्रमाणे आज सकाळी घरी आल्या असता त्यांना घराची कडी तोडलेल्या अवस्थेत आढळली. तर लॉक हा तुळशी वृंदावनाच्या जवळ टाकलेला दिसला. घरातील दोन कपाट ङ्गोडून सामान अस्थाव्यस्थ असल्याचे चित्र दिसून आले. त्यांनी तातडीने पेण पोलीस ठाण्यात कळवले. त्यानंतर पेण पोलीस ठाण्याचे गुन्हा प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. काही वेळाने पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदिप बागूल यांनी ही घटनास्थळाची पाहणी करून तातडीने ङ्गॉरेनसीक टिमला प्राचारण केले आहे. प्रथमदर्शनी या चोरीमध्ये दिडलाख रुपये आणि सोन्याच्या कानातल्या रिंगा गेल्याचे निदर्शनास आले आहे. पेण पेालीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 305 चा 1 आणि 331 चा 4 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढिल तपास पोलीस निरिक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण शाखा करत आहेत. याविषयी गर्जा रायगड साद संवादशी पोलीस निरिक्षक संदिप बागुल संवाद साधून नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले आह
