मावश्यांना देणार आधाराची सोबत
पेण : प्रतिनिधी
महिला दिनाचे औवचित्य साधून ८ मार्च रोजी सोबती संस्थेमार्फत विविध संस्थांमध्ये माफक मानधन घेऊन ज्या महिला मावशी म्हणून काम करत आहेत. अशा सर्व मावश्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे पूढील आयुष्यात कौटुंबिक आडचणीमध्ये कायदेशीर, आरोग्य या समस्यांमध्ये कायमस्वरूपी मदत व मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्राची उभारणी देखील केली जाणार आहे. ८मार्च रोजी पेण एज्युकेशन सोसायटीच्या बैठक हॉलमध्ये या मावश्यांचा सत्कार मनोरंजन तसेच आरोग्य विषयी व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी अश्विनी गाडगीळ, अध्यक्षा अहिल्या महिला मंडळ, प्रमुख व्याख्यात्या डॉ. सोनाली वनगे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी ३ ते ७ च्या दरम्यान होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी सोबती संस्थेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अॅड बापुसाहेब नेने, अध्यक्ष अॅड. मंगेश नेने, सचिव डॉ. निता कदम, खजिनदार निलेश म्हात्रे, प्रितेश दोशी, धनश्री दोशी, ज्योती राजे, विजया जागडे अदी उपस्थित राहणार आहेत.
