पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील उंबर्डे गावचे सुपूत्र ज्येष्ठ आधुनिक शिल्कार किशोर ठाकुर यांना महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासन कला, साहित्य संस्कृती आणि पत्रकारीता क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना त्यांच्या जीवनभराच्या योगदानाबाबत जीवनगौरव पुरस्कार प्रदानकर्ते आजवर राज कपूर, व्ही. शांताराम, विंदा करंदीकर, यासारख्या दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला असून, यंदाच्या कला क्षेत्रामध्ये किशोर ठाकुर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. किशोर ठाकुर यांचा जन्म 1 जून 1957 ला उंबर्डे येथे एका शेतकरी कुंटुंबात झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण उंबर्डे येथेच पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी पेण शहर गाठले. पुढे जे.जे कला महाविद्यालय मुंबई येथे शिल्पकलेची पदवीका घेतली. 1981 च्या सुमारास त्यांनी चुनाभट्टी मुंबई येथे स्वताःचे कला वर्क शॉप सुरु केले. त्यानंतर गावाच्या ओढीने ते आपल्या मुळ गावी उंबर्डे येथे आले आणि स्वताःचे सुसज्ज असे कला दालन सुरु केले आहे. गेली 45 वर्ष अविरतपणे आधुनिक शिल्पकला ते जोपासत आहेत. त्यांच्या या योगदानाबाबत महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
