पेण : प्रतिनिधी
पेण शहरातील कवंडाळ तळे, नंदिमाल नाका, धरमतर रोड, अंतोरा फाटा, कोळीवाडा नाका यांसह वडखळ परिसरातही मटक्याचा अवैध धंदा तेजीत सुरू असल्याचे आरोप होत आहेत. बोरी फाटा येथे भूषण नामक व्यक्तीकडून मटका व्यवसाय चालवला जात असल्याची चर्चा आहे. या कथित अवैध धंद्यांवर कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
खाकीचा धाक नाही की पडद्यामागून कोणाचे अभय? अवैध धंद्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता पोलिस प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार की मटका माफियांचे फावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
