पेण : प्रतिनिधी
सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत पेण नगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘विकसित भारत’ या विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ही स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांत घेण्यात आली. लहान गटात तन्वी कृष्णा म्हात्रे (सौ. म. ना. नेने कन्या विद्यालय) हिने प्रथम, हर्षिता भरत ढवळे (गुरुकुल) हिने द्वितीय, तर शिवन दिनेश कुमार मौर्य (नगरपालिका शाळा क्र. ७) याने तृतीय क्रमांक पटकावला.
मोठ्या गटात गार्गी अमित पाध्ये (सौ. म. ना. नेने कन्या विद्यालय) हिने प्रथम, तीर्था पवन भोईर (गुरुकुल विद्यालय) हिने द्वितीय, तर रिद्धी रंजित पाटील (गुरुकुल विद्यालय) हिने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, सभापती कलावती पाटील, सुनीता जोशी, अफ्रीन अखवारे, नगरसेविका पल्लवी कालेकर, अंजली जोगलेकर, ज्येष्ठ नगरसेविका मालती म्हात्रे, नगरसेवक मितेश शहा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आरोग्य विभागप्रमुख दयानंद गावंड, ओएस गणेश ठाकूर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन स्मिता पाटील यांनी केले.
