मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यास दुश्मी खारपाडा ग्रामपंचायत सज्ज

Uncategorized

विशेष ग्रामसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अभियानाच्या अंमलबजावणासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन

पेण: प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून ग्रामविकास विभागाच्या वतीने या अभियानास मान्यता देण्यात आली आहे. दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या अभियानाची सुरुवात सर्वत्र विशेष ग्रामसभा घेउन करण्यात आली.

पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत च्या वतीने ही बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी स्वयंभू मंदिर ठाकूर पाडा येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवित उत्स्फूर्त प्रतिसाद देत या अभियानात आपला सक्रिय सहभाग देण्याचे कबूल केले आहे. अभियानातील मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ग्रामसभेचे निरीक्षक म्हणून पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांचे प्रतिनिधी श्री. मांडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच नेत्रा घस्त यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच वर्षा देसले, मा. पोलीस उप निरीक्षक महादेव घरत, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, रसिका ठाकूर, संजय घरत, विनायक कोळी, रुपाली पाटील, राजश्री घरत, हिरामण घरत, ग्राम विकास अधिकारी अर्चना थळे, पी. पी. मोरे, कृषी सहाय्यक रचना पाटील, स्वयंभू देवस्थान ट्रस्टचे शशिकांत ठाकूर, संदीप ठाकूर, दिलीप पाटील, माजी सदस्य क्षेता देसले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस महिला बचत गटाच्या प्रतिनिधी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी यांच्यासह शालेय विद्यार्थी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला सरपंच नेत्रा घरत यांनी उपस्थितांचे स्वागत करुन सभेची सुरुवात केली तर ग्राम विकास अधिकारी अर्चना थळे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बदलची माहिती देताना सांगितले की, या अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागातून ग्रामविकासाला चालना मिळावी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढावी तसेच ग्रामीण नागरिकांच्या मूलभुत गरजा प्रभावीपणेपूर्ण व्हाव्यात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, पर्यावरण, महिला व बालविकास यांसह ग्रामस्थांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी विविध योजनांचे एकत्रित अंमलबजावणीवर भर दिला जाणार असून या अभियानात राज्य व जिल्हा पातळीवर उत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना परस्कार देउन प्रोत्साहन देण्यात येईल असेही थळे यांनी स्पष्ट केले. यावेळी सदर अभियानाच्या प्रभारीय समिती स्थापन केल्यानंतर संजय घरत यांनी उपत्त्थितांचे आभार मानून सभेची सांगता केली ही सभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सहाय्यक काशिनाथ ठाकूर, वत्सला पाटील, गौरव देसले, मनोज पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.