बालविवाह हि छोटी गोष्ट नसुन त्याचे गांभीर्य खुप मोठे आहेः पोलिस निरिक्षक संदिप बागुल

Uncategorized

पेण : प्रतिनिधी

नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अंतर्गत बालविवाह विरोधी जनजागृती मोहिमेची सुरूवात. पेण तालुक्यातील शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या घोटे गावातून आई जगदंबेला पोलीस निरिक्षक संदीप बागूल आणि संपादक संतोष पाटील यांच्या हस्ते हार घालून व नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रथम आदिवासी समाजाचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जोमा दरोडा यांनी अभियानासाठी मार्गदर्शक म्हणून आलेल्या सर्वांचे स्वागत गुलाबपुष्प देउन केले त्यानंतर संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील यांनी बाल विवाह म्हणजे काय आणि ते करणे किती चुकीचे आहे या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कायदेशीर मार्गदर्शन पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदिप बागूल यांनी केले त्यावेळी सांगितले की, बाल विवाह ही बाब वर वरुन छोटी दिसत असेल. परंतु ही गोष्ट छोटी नसून त्याचे गांभीर्य खुप मोठे आहेत. यावेळी त्यांनी पोस्को कायद्याअंतर्गत कशी कारवाई होते हे देखील समजावून सांगितले. यावेळी मा. जिल्हा परिषद सभापती हरी कृष्णा वाघ, सरपंच हरी महादू वाघ, हे उपस्थित होते. त्या नंतर अष्ट्याहून सर्वजण करंबेली आदिवासी वाडी येथे गेले असता त्या ठिकाणी देखील आदिवासी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. व येथे पोलीस उपनिरिक्षक विकास नवरखेडे यांनी मार्गदर्शन केले.

या अभियानाच्या टिममध्ये पोलीस निरिक्षक संदिप बागूल, उपपोलीस निरिक्षक विकास नवरखेडे, संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील, शांतता कमिटी सदस्य अमोल घोटणे, पोलीस कर्मचारी, किशोर घरत, सागर खांडसकर, सौ. कुथे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल वाघ नरेश कडू, अदी सामिल होते.