पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील पाटणोली गावाचे माजी सरपंच रमाकांत ऊर्फ देव दामोदर म्हात्रे यांचा अल्पशा आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांनी सलग १० वर्ष पाटणोली ग्रामपंचायतीचे बिनविरोध सरपंच म्हणून काम पाहिले. तसेच १० वर्ष गाव पंच म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कारर्कीदीमध्ये पाटणोली गावच्या ब्रिटीश कालीन पुलाची रुंदी वाढवून, श्री. क्षेत्र पाटणेश्वर येथे बस, ट्रक, मोठी चारचाकी वाहने जाण्यासाठी सोय केली. तसेच अनेक विकासाची कामे करुन गावाला एक वेगळीच दिशा दिली. एकेकाळी त्यांनी गावामध्ये समर्थपणे माजी आमदार मोहनभाई पाटील यांची बाजू भक्कमपणे मांडून शेकापपक्षाची धुरा सांभळली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार असून, शेवटपर्यंत गावाच्या भल्याचा विचार त्यांनी केला. त्यांच्यावर अंतसंस्कार पाटणेश्वर येथील स्मशानभूमीत झाला. त्यावेळी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेकजण उपस्थित होते.
