शिवशाहीर वैभव घरत यांना पितृशोक

Raigad

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील खारोशी येथील शिवशाहीर तथा रायगड भूषण वैभव घरत यांचे वडील धनाजी महादेव घरत यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धनाजी घरत हे स्वभावाने करारी, संयमी व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. आपल्या शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठस्वभावामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. शेतकरी कामगार पक्षाचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख होती.

शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. मोठी कन्या वैशाली या एम.ए., बी.एड. शिक्षण पूर्ण करून सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिवशाहीर वैभव घरत यांनी कृषी शाखेची पदवी घेतली असून ते सध्या ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. तर धाकटे चिरंजीव वैष्णव यांनी पीएचडी पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

धनाजी घरत यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, सुना आणि नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर खारोशी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.