रेन्यूसीस इंडिया लिमिटेड कंपनीच्या कामगारांच्या एक जुटीचा विजय

Raigad

३०० ते ४०० कामगारांना सेवेत कायम ठेवण्याचे आश्वासन 

पाताळगंगा परिसरातील रेन्यूसीस इंडिया लिमिटेड सोलर पॅनल कंपनीने ३०० ते ४०० कामगारांना अचानक कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात पेण पंचायत समितीचे उपसभापती तथा भाजप तालुकाध्यक्ष संजय डंगर यांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील पाटील यांच्या पाठिंब्याने सुमारे २० ते २५ दिवसांपूर्वी आंदोलन सुरू करण्यात आले होते. अखेर या लढ्याला यश आले असून, कंपनी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत एकाही कामगाराला सेवेतून कमी केले जाणार नसल्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती आहे. संजय डंगर यांच्या नेतृत्वाखालील लढा आणि कामगारांच्या एकजुटीमुळे मिळालेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.