२४ व २५ ऑक्टोबरला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजन
पेण :- प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १५ व १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघ निवडीसाठी २४ व २५ ऑक्टोबर रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट मैदानावर निवड चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील होतकरू मुलींच्या क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी या शिबिरातून मिळणार आहे.
१५ वर्षांखालील गटासाठी १ सप्टेंबर २०१२ नंतर जन्मलेल्या, तर १९ वर्षांखालील गटासाठी १ सप्टेंबर २००८ नंतर जन्मलेल्या मुली पात्र असतील. इच्छुक खेळाडूंनी सकाळी ९.३० वाजता मैदानावर उपस्थित राहावे. यावेळी क्रिकेटचा पांढरा गणवेश परिधान करणे आवश्यक असून, वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व जन्माचा दाखला सोबत आणावा.
या निवड चाचणीसाठी पुष्कराज चव्हाण, मनोहर अहिर, सचिन घरत आणि प्रसाद देशपांडे हे निवड समिती सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तर विनय पाटील व अस्मिता गोवारी हे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळतील.
जिल्ह्यातील पात्र मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध रवींद्र पाटील यांनी केले आहे
