पेण : प्रतिनिधी
पेण हमरापूर मंडळ अधिकारी व तलाठी सजा जिर्णे यांचे कार्यालय पेण प्रायव्हेट हायस्कूल रस्त्यालगत असून, या कार्यालयात शेकडो शेतकरी ये-जा करत असतात. मात्र, कार्यालयाच्या दारातच मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, ग्लास आणि सिगारेटची पाकिटे पडलेली दिसत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपान केले जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच असा प्रकार घडत असताना मंडळ अधिकारी पेण, मंडळ अधिकारी हमरापूर आणि तलाठी जिर्णे यांना याचे गांभीर्य का वाटत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. शासकीय कार्यालयासमोरील या अस्वच्छतेकडे महसूल विभागाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
