Author: Santosh Patil
कोंडी टाळण्यासाठी शासनाचा निर्णय; 11 ते 26 सप्टेंबरदरम्यान विविध टप्प्यांत निर्बंध
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 16 टन किंवा त्याहून अधिक वजनक्षमतेच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. परिवहन विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. गणेशोत्सव काळात कोकणात एसटीच्या जादा बसेससह खासगी वाहनांची मोठी वर्दळ वाढते. त्यात […]
Continue Readingजनगणनेसाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करा नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे आवाहन
पेणः प्रतिनिधी पेण शहरात होणारी जनगणना ही शहराच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांनी जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रीतम पाटील यांनी केले आहे. जनगणनेमुळे शहराची अचूक लोकसंख्या समोर येणार असून त्याआधारे शासनाकडून विविध विकासकामे, पायाभूत सुविधा आणि निधीचे नियोजन केले जाते. चुकीची किंवा अपुरी लोकसंख्या नोंद झाल्यास भविष्यात शहराच्या विकासावर परिणाम […]
Continue Readingप्रसन्न मोडक यांना पितृशोक
पेण : प्रतिनिधी पेण शहरातील सुप्रसिद्ध चिंतामणी कॅटेरर्सचे मालक प्रसन्न मोडक यांचे वडील तथा ज्येष्ठ नागरिक कै. वैजनाथ मोडक (वय ९२) यांचे गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पेण शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. कै. वैजनाथ मोडक हे शांत, मनमिळाऊ व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित […]
Continue Readingपेणचे ‘चिक्कीवाले काका’ काळाच्या पडद्याआड; आठवणींची गोड चव कायम
पेण:-प्रतिनिधी पेण शहराच्या बसस्थानकात एकेकाळी प्रवाशांच्या ओठांवर जशी पेणच्या पेढ्यांची गोडी रेंगाळत असे, तशीच खोबऱ्याच्या चिक्कीची अवीट चव देणारे तुकाराम म्हात्रे उर्फ ‘चिक्कीवाले काका’ आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या निधनाने पेणच्या सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील एक जिव्हाळ्याचा, प्रेमळ आणि सर्वपरिचित चेहरा हरपला आहे.अनेक दशकांपासून पेण बसस्थानक परिसरात खोबऱ्याची चिक्की विकून त्यांनी हजारो प्रवाशांच्या मनात […]
Continue Readingत्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारी बकरी ईद पेणमध्ये उत्साहात साजरी
पेण : प्रतिनिधीमुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र सण म्हणून ओळखली जाणारी बकरी ईद (ईद-उल-अजहा) पेण शहरात धार्मिक वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईद हा सण त्याग, श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा मानला जातो. हजरत इब्राहिम यांनी अल्लाहप्रती असलेली निष्व आणि त्यागाची भावना दाखवून दिल्याच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. समाजात बंधुभाव, प्रेम […]
Continue Readingवारकरी संप्रदायातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपलेः
ह.भ.प. श्री नामदेव महाराज म्हात्रे यांचे दुःखद निधन पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वडखळ गावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार तथा श्रीमंत संगीत भागवत कथाकार ह.भ.प. श्री नामदेव महाराज म्हात्रे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. आपल्या आयुष्यभर हरिनामाचा प्रचार, समाजप्रबोधन आणि धार्मिक कार्यासाठी झटणारे हे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने वडखळसह संपूर्ण रायगड जिल्हा हळहळ व्यक्त […]
Continue Readingभारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
पेणः प्रतिनिधि पेण तालुक्यातील धामणी गावात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना शिंदे गटातील गायकर कुटुंबियांनी भारतीय जनता पक्षात ज केला आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. पांडुरंग गायकर, शिवसेना उपशाखा प्रमुख रोशन गायकर तसेच किरण गायकर यांनी भाजपमध्ये आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार तथा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष […]
Continue Readingशिवशाहीर वैभव घरत यांना पितृशोक
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारोशी येथील शिवशाहीर तथा रायगड भूषण वैभव घरत यांचे वडील धनाजी महादेव घरत यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धनाजी घरत हे स्वभावाने करारी, संयमी व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. आपल्या शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठस्वभावामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण […]
Continue Readingगेलच्या उरण–उसर प्रोपेन पाइपलाईन प्रकल्पाला वेग; रायगडातील ३५ गावांत काम प्रगतीपथावर
पेण : GAIL (India) Limited यांच्या उरण–उसर प्रोपेन पाइपलाईन प्रकल्पाचे काम रायगड जिल्ह्यात वेगाने सुरू असून, उरण, पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील एकूण ३५ गावांमधून ही पाइपलाईन टाकण्यात येत आहे. ही माहिती उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (महाराष्ट्र राज्य), सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.पेट्रोलियम व खनिज पाइपलाईन कायदा १९६२ अंतर्गत या प्रकल्पासाठी […]
Continue Reading