वयाच्या ९४ व्या वर्षी चंद्रभागा साळुंके काळाच्या पदद्याआड

Uncategorized

पेण : प्रतिनिधी

कै चंद्रभागा मुकूंद साळुंके यांचा जन्म १४/०८/१९३२ साली पेण वरसई या भागामध्ये झाला. जन्म सुखमय कुटूंबात झाला. वरसई विभागामध्ये आष्टे या गावी शालेय शिक्षण घेतले. वारंवार फिरती करावी लागत असल्याने शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले.
वावोशी येथे राहून मुलांचे शिक्षण केले. मुलांना नोकरी सरकारी लावून दिले. ३ मुले, १ सून, सरकारी नोकरीत होते. कुटूंबातील कर्ता करविता ही भुमिका निभावून सर्वांना माया, ममता लावली. घरामध्ये कोणीही माणूस आला तर रिक्त हस्ते कधीही परत गेला नाही. त्यांचा आदर सत्कार, चहापाणी, जेवण दिल्याशिवाय जाणारच नाही.
आज ही आपण ब्रिटीश कालीन नंबर रोवलेले जागेची खूण म्हणून उपयोग करत आहोत. वरसई जावळी, गागोदे बुद्रुक, गागोदे खुर्द, वाशीवली, आष्टे, पाडले, खरोशी, ईरवाडी येथील सर्व गावांची नंबर दाणी (नंबर रोवणे) चे काम केले आहे. ते आज ही शेतकऱ्यांची जमीन असल्याचे सिध्द करत आहे.
मनमिळाउ सुस्वभावी, दानशुर, अशा कै. चंद्रभागा मुकूंद साळुंके यांचे निधन वयाच्या ९४ वर्षी ५ पिढया पाहिल्या नंतर निधन झाले आहे.