पेण ः प्रतिनिधी
डॉ.सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि ग्रामस्थ मंडळ कारावी व नवतरुण मंडळ सामाजिक विकास मंडळ कारावी यांच्या संयुक्त विद्यमाने कारावी येथील केरेश्र्वर मंदिर येथे मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. हे शिबिर कारावी येथे व्हावे म्हणून आरोग्य दुत तथा मा.जिल्हा परिषद सदस्य डी.बी.पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
कारावी पंचक्रोशीतील 76 नागरिकांनी या मोङ्गत नेत्र चिकित्समध्ये सहभाग घेतला. यामध्ये मोतीबिंदू 23 रूग्ण सापडले. तर चष्मा धारकर 16 तर पुढील तपासासाठी 12 जणांना पाठवले आहेत. या शिबिरा दरम्यान राष्ट्रीय खेळाडू तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय मोकल यांचे देखील सत्कार करण्यात आले तसेच हा कार्यक्रम सुयोग्य पध्दतीने पार पडावा म्हणून मा. सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मोकल, संजय मोकल आणि भाजपचे युवा कार्यकर्ते चंद्रकांत खंडू पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी अनिल मोकल, पांडुरंग पाटील, बाळाराम मोकल, संतोष पाटील, प्रकाश मोकल, अदींसह नवतरूण कारावी तरुण मंडळाचे असंख्य कायकर्ते तसेच ग्रामस्थ हजर होते. तसेच ज्या रुग्णाना मोती बिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली त्यांना तातडीने पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट येथे नेउन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
