पेणःप्रतिनिधी
पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ.म.ना.नेने कन्या विद्यालयाचे पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष ऍड.मंगेश नेने तथा प्रमुख अतिथी मा.विद्यार्थीनी डॉ.कु.शिवानी चारूदत्त चिखले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपिठावर उपाध्यक्ष संजय कडू, कार्याध्यक्ष प्रशांत ओक, मानद चिटणीस सुधीर जोशी, संचालक समिर साने, डॉ. निता कदम, दिगंबर चिखलेकर, श्रीराम दातार, माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब देव, माजी मानद सचिव बापूसाहेब आठवले अदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने झाली. त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी इशस्तवन व स्वागत गीत गायले. त्यानंतर कला प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक उपमुख्याध्यापक आर.सी.पाटील यांनी केले तर प्रमुख अतिथी डॉ.शिवानी चिखले संस्थेचे अध्यक्ष ऍड.मंगेश नेने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या नंतर पाहुण्याच्या हस्ते शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या विदयार्थ्यांना पारितोषिक देउन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
