पेणकरांनी काढली तिरंगा रॅली

Political

पेण ः प्रतिनिधी
आतंकवादयांनी पहलगाम येथे भारतीय पर्यटकांना लक्ष करुन भ्याड हल्ला केला. यामध्ये 26 भारतीय पर्यटक मारले गेले. त्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानला उत्तर देत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आतंकवाद्यांना मुहतोड उत्तर देत ऑपरेशन सिंदुर यशस्वी केले. या विजयाचा आनंद आणि जवानांनाचे मनोबल उंचविण्यासाठी 18 मे रोजी सकाळी 9ः30 वाजता महात्मा गांधी वाचनालयासमोरील स्वातंत्र सेनानी स्मारकाजवळून तिरंगा रॅली काढण्यात आली. त्या अगोदर मा.सैनिकांचे अथोचित सन्मान खा.धैर्यशील पाटील आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माबरोबर सर्व पक्षिय कार्यकर्त्यांस पुढारी सहभागी झाले होते. तालुक्या बाहेरील ही काही नेते मंडळी या रॅलीमध्ये सामिल झाले होते. यामध्ये मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, पालीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा, राजा मपारा, यासह पेण तालुक्यातील मा. स्वातंत्र सैनिक, मा.शिक्षक संघटना, विदयार्थी, तसेच जिल्हा परिषद मा. अध्यक्षा निलीमा पाटील, किसान जिल्हा अध्यक्ष परशुराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादु मानकर, जि.प.सदस्य डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे (हरि ओम) मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील, मा.उपनगराध्यक्ष वैशाली कडू, मा. नगरसेविका देवता साकोस्कर, मा. नगरसेविका नलिनी पवार, मा.नगरसेवक अनिरूध्द पाटील, भाजप जिल्हा सरचटणीस मिलींद पाटील, भाजप तालुका अध्यक्ष विजय पाटील, ऍड.मंगेश नेने, शेहनाज मुजावर, सुनिता जोशी, प्रकाश रामाणे, जनार्दन जाधव, अजय शिरसागर, मा.नगरसेवक संतोष पाटील, मुरलीधर भोईर, अमित पाटील, चंद्रकांत पाटील, भुषण कडू, संजय म्हात्रे, राजन वाडेकर, जयेश म्हात्रे, साकिब मुजावर, डॉ.मनिष वनगे, डॉ.सोनाली वनगे, डॉ.निता कदम, यांच्यासह वेगवेगळया समाजाचे अध्यक्षांसह मोठया संख्येने पेणकर सामिल झाले होते. ही तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे व भाजप तालुका अध्यक्ष संजय डंगर यांनी मेहनत घेतली. ही रॅली डॉ.बाबा साहेब आंबेडकर चौक, कोतवाल चौक, धरमतर रोड, राजू पोटे मार्ग, पंका पाटील चौक, खाटीक मोहल्ला, महाविर मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गीत मोठया उत्साहात सादर करण्यात आले. शेवटी खासदार धैर्यशील पाटील यांनी भारतीय सैनिकांसाठी आपले मनोगत व्यक्त केले. मा. सैनिक सुरेंद्र ठाकुर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.