पंचायत समितीच्या 20 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस, नोटीस चा परिणाम त्यांच्यावर होणार का?

Raigad

पेणःप्रतिनिधी
19 मे रोजी गर्जा रायगड साद संवादचे संपादक यांनी पेण पंचायत समितीत जाउन कार्यालयाची पाहणी केली असता 36 कर्मचार्‍यांपैकी 4 कर्मचारी हजर होते. या विषयाला धरून 19 मे रोजी हम नहि सुधरेंगे या मथल्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर गट विकास अधिकारी अविनाश घरत यांनी 20 कर्मचार्‍यांना कारणेदाखवा नोटीस दिली असून येत्या चार दिवसात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.
एकूण 20 कर्मचार्‍यांना कारणेदाखवा नोटीस दिली आहे. यामध्ये राजाराम मोरे सहा.प्र.अधिकारी, विक्रांती अशोक तांडेल वि.अ.पंचायत समिती, प्रसाद म्हात्रे विस्तार अधिकारी, निधी भोसले विस्थार अधिकारी कृषि, तेजस्विनी वर्तक विस्तार अधिकारी कृषि, समिर सानप आरोग्य पर्यवेक्षक, स्मिता निलकंठ म्हात्रे क.अभियंता, महेंद्र पाटील व.साहाय्यक लिपीक, सुधा दिलीप पाटील क.सहाय्यक लिपीक, सेजल विनोद केतकर क.सहाय्यक लिपीक, ओमकार टालकुटे क.सहाय्यक लिपीक, संदेश कटवटे वरीष्ठ सहाय्यक लेखा, जयश्री जाधव वरीष्ठ सहाय्यक, विदया खंडागळे वरीष्ठ सहाय्यक, सुधीर मढवी कनिष्ठ सहाय्यक, वृषाली मोकल कनिष्ठ सहाय्यक, सुधा पाटील कनिष्ठ सहाय्यक, छाया पाटील कनिष्ठ सहाय्यक,सेजल केतकर कनिष्ठ सहाय्यक, रंजना लोखंडे पशुधन पर्यवेक्षक, सुर्यकांत परब स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रतिक्षा शिंदे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या सर्वांविरूध्द महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तवणूक नियम 1967 च्या कलम 3 अन्वये कारणे दाखवा नोटीस दिली असून, येत्या चार दिवसात या 20 कर्मचार्‍यांकडून योग्य तो खुलासा मागितला आहे. योग्य तो खुलासा न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करून त्या दिवसाचे वेतन कपात केले जाईल. अशा प्रकारची लेखी नोटीस गट विकास अधिकारी अविनाश घरत यांनी या सर्व 20 कर्मचार्‍यांना दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे पंचायत समिती कार्यालयात असलेली बायोमेट्रीक हजेरी पध्दत ही सात महिन्या पुर्वी कार्यान्वित करून आज ही कार्यालयातील संगणकला अपलोड केली नसल्याची माहिती कार्यालयीन प्रमुख सुनिल गायकवाड यांच्याकडून मिळाली तर गट विकास अधिकारी अविनाश घरत यांनी गर्जा रायगड साद संवादशी बोलताना सांगितले की, गैरहजर कार्मचार्‍यांवर कारणे दाखवा नोटीस दिली असून वारंवार अशाच चुका केल्या तर कर्मचार्‍यांविरुध्द विभागीय चौकशी केली जाईल. व हा रिपोर्ट माननीय उप मुख्य कार्यकारी सामान्य प्रशासन रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जाईल असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. या पुढे तरी पेण पंचायत समितीतील कर्मचार्‍यांना वेळेवर येण्याची सुबुध्दि येवो एवढीच माफक अपेक्षा.