ऍड. मंगेश नेने यांची गव्हर्निंग कौस्निलच्या सदस्य पदी बिनविरोध निवड

Raigad

पेण ः प्रतिनिधी
कास्प संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ऍड. मंगेश नेने यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्यातील त्यांच्या भरीव कामगिरीमुळे ही निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यात नवीन उर्जा आणि दिशा मिळेल असा, विश्वास व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीत माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर यांची गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे तसेच, भाग्यश्री डेंगळे यांची उपाध्यक्षपदी आणि निवेदिता दासगुप्ता यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
ऍड. मंगेश नेने याची गव्हर्निंग कौन्सिलच्या पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंद केले जात आहे.