पेण एज्युकेशन सोसायटी ही ११५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. प्राथमिक शिक्षणा पासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाची सोय या संस्थेने पेण सारख्या ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेत भाऊसाहेब नेने महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्राचार्य डॉ सदानंद भास्कर धारप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. स्नेहल सुशील कांबळे यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील उच्चतम पदवी विद्यावाचस्पती( Ph. D. ) मिळविली आहे. पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण येथे गेले दहा वर्षांपासून रसायनशास्त्र विषयातील संशोधन केंद्र सुरू आहे. याच विषयात पदव्युत्तर पदवी चे शिक्षणही मिळते . अशा ग्रामीण भागात संशोधन केंद्र सुरू असणे हे कौतुकास्पद आहे. सदरचे संशोधन केंद्र हे तत्कालीन अध्यक्ष ॲड बापुसाहेब नेने व त्यांचे सहकारी यांचे प्रेरणेने सुरू झाले . तसेच सध्याचे अध्यक्ष ॲड मंगेशजी नेने व त्यांचे कार्यकारीणीतील सर्व सहकारी यांच्या प्रोत्साहनामुळे प्रगती पथावर आहे. या विद्यार्थ्यीनीचे व तीचे संशोधन मार्गदर्शक प्राचार्य डॉ. सदानंद भास्कर धारप यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पुढील काळात असं यश मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्व गोष्टी मधे रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी , ग्रंथालय प्रमुख आणि पेण एज्युकेशन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य , मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रविंद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरु डॉ. अजय भामरे यांचेही सहकार्य लाभले असं मत मार्गदर्शक प्राचार्य डॉ सदानंद भास्कर धारप यांनी सांगितले. भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना हे यश मार्गदर्शक ठरेल अशी भावना व्यक्त केली.
