कु. हर्षा पाटील प्रभाग क्रमांक 4 मध्ये लढणार ?
पेण ः प्रतिनिधी
माजी मंत्री रविशेठ पाटील यांची नात तथा युवा नेते अनिरुध्द पाटील यांची लेक कु. हर्षा पाटील हिने प्रभाग क्र. 4 मधून निवडणुक लढवावी अशी मागणी प्रभाग क्रमांक 4 च्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे कु. हर्षा पाटील हिला प्रभाग 4 मध्ये निवडणुक लढविताना पहायला मिळाल्यास कुणाला नवल वाटू नये. कु. हर्षा पाटील हिची राजकारणात इनिंगची सुरुवात झाल्यास रवीशेठ पाटील यांची तिसरी पिढी आपण राजकारणात पाहणार आहोत. कु.हर्षा ही उच्चशिक्षित असून संस्कारी मुलगी आहे. त्यामुळे रवीशेठ पाटील यांच्या राजकारणाचा वारसा ती पुढे चालवू शकते.
विधानसेभेच्या निवडणुकीमध्ये कु. हर्षा पाटील हिने अजोबाच्या प्रचारामध्ये विशेष सहभाग घेउन आघाडी घेतली होती. त्यामुळे कळत नकळत तिला राजकारणाचे बालकडू हे घरातून मिळालेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तिच्या उमेदवारीची जी मागणी केलेली आहे. ती मागणी योग्यच असल्याचे राजकीय समीक्षकांचे म्हणणे आहे.
