जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पेण नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेमध्ये प्रायव्हेट हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी संतोष शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवून प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पेणच्या शिरचेपात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे.
मुद्देसूद मांडणी,सुमधुर वाणी आणि विषयावर मजबूत पकड अशा पद्धतीने श्रावणीने माझी प्रेरणास्थान स्त्री या विषयावर दमदार भाषण केले.या स्पर्धेसाठी पेण शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ प्रीतम ताई पाटील या स्वतः उपस्थित होत्या.
अतिशय चुरशीच्या आणि मानाच्या या स्पर्धेमध्ये 15 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी श्रावणी ला मार्गदर्शन मराठी विषयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका सौ के के पाटील प्राध्यापक श्री मानकवळे प्राध्यापिका सौ नूतन पाटील आणि प्राध्यापक सुंदर बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. श्रावणी सोबतच शिखा यादव हिनेही अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले. परंतु वेळ मर्यादा मुळे शिखाचा नंबर येऊ शकला नाही. शिखा चा नंबर जरी आला नसला तरी तिचे सादरीकरण अतिशय उत्कृष्ट असेच होते.
तसेच दुसरा क्रमांक रोशनी सावंत या आपल्या माजी विद्यार्थिनी पटकावला.
