पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम

Raigad

पेण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने पेणमध्ये ‘शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.

चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, चेअरपर्सन संदेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच पेण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रितमताई पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आज, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता, उत्कर्षनगर, पेण-खोपोली रोड येथील सी.एफ.आय. बिल्डिंगमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार असून, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.