पेण प्रतिनिधी
नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अंतर्गत बालविवाह विरोधी जनजागृती मोहिमेची सुरुवात २२ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती त्याची सांगता दहा दिवसांनी म्हणजेच १ ऑक्टोंबर रोजी विराणी वाडी येथे पोलीस निरिक्षक संदिप बागुल यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. या मोहिमेसाठी गेली दहा दिवस पोलीस उपनिरिक्षक विक्रम नवरखेडे, पोलीस हवलदार किशोर घरत, दामिनी पथक, आणि सामाजिक कार्यकर्ते संदिप वाघ, नरेश कडू यांच्या सोबत संपादक नगरसेवक तथा शांतता कमिटी सदस्य संतोष मंदा लक्ष्मण पाटील, शांतता कमिटी सदस्य अमोल घोटणे, पत्रकार अनिस मनियार, राजेश कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. दहा दिवसात पेण तालुक्यातील ३६ आदिवासी वाड्यांमध्ये जाउन बालविवाह विरोधी जनजागृती केली. यामध्ये पोलिस उपनिरिक्षक विक्रम नवरखेडे आणि संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील व संदिप वाघमारे हे मार्गदर्शन करत होते. शेवटच्या दिवशी पाचगणी येथे यांच्या सोबत डॉ. नेत्रा पाटील, विश्वास वाघ, हे देखील होते. आणि शेवटची ३६ वी विराणी वाडी येथे पोलीस निरिक्षक संदिप बागुल यांनी मार्गदर्शन करताना कायद्याची बाब समजावून सांगितली तर संतोष पाटील यांनी बाल विविह केल्याने काय दुष्परिणाम होतात हे सांगितले. शेवटी खेळीमेळीच्या वातावरणात शेवटचे सत्र संपले. यावेळी विराणी वाडीच्या आदिवासी बांधवांनी आपली कैफियत पोलीस निरिक्षक संदिप बागूल यांच्याकडे पर्यटनाच्या नावाने येणारे जोडपे खुलेआम उघड्यावर व्यविचार करतात. त्यामुळे कळत-नकळत त्यांचे परिणाम आमच्या मुलांवर होतात. ठाणेमार्फत शनिवार रविवार या भागात गस्ती असावी. आणि त्यांचे हे म्हणने ऐकून पोलीस निरिक्षक संदिप बागूल यांनी येत्या शनिवार रविवार पासून करण्याचे आश्वासन दिले. तर पोलीस ठाणेकडून बाल विवाह मोहिम हे स्तुत्य उपक्रम राबिवल्या बद्दल आदिवासी समाजाचे कार्यकर्ते सुनिल वा पोलीस ठाणे आणि शांतता कमिटी सदस्यांचे आभार मानले. तसेच रायगड पोलीस मार्फत तरुणांना संधी उपलब्ध होणार आहेत त्यासाठी तरूणांनी नोंदणी करावी असे देखील अवाहन पोलीस निरिक्षक संदिप बागूल यांनी केले. आणि बाल विवाह मोहिमेची सांगता करण्यात आली. रायगडमध्ये प्रक उपक्रम पेण पोलीस ठाणे यांनी राबवून रायगड पोलीसांसमोर एक नविन आदर्श निर्माण केले आहे.
