पेणचा बाजार सोन्याने व झेंडूने सजला

Uncategorized

दसऱ्याला झेंडू महागला, पावसाने आवक घटली !

पेण : प्रतिनिधी

गेली दहा ते पंधरा दिवस पावसाने झोडपून काढल्याने झेंडूच्या फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झेंडूच्या फुलांची आवक घटली आहे. साडेतीन मुहूतपैिकी एक असलेल्या दस्याच्या मुहूर्ताच्या निमित्ताने बाजारात नागरिक गर्दी करत आहेत. पेणची बाजारपेठ फुलांनी व सोन्याने म्हणजेच आपट्याच्या हिख्या पानांनी सजली आहे. मात्र काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आवक कमी झाली असून, फुलांच्या किंमती वाढल्या आहेत. बाजारात पिवळा, भगवा, नामधारी, लाल या प्रकारातील झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. १०० ते १५० रुपये किलो भावाने नाशिकी झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. तर कलकत्ता फुलांची विक्री १५० ते १८० रूपयांनी होत आहे. यासह अस्टर, मोगरा, जाई, जुई, चाफा, गुलछडी, गुलाब, सोनचाफा, जरभरा या फुलांचा बाजार सुरू आहे. यासह झेंडूच्या फुलांचा एक मीटर हार १०० रुपये, तोरण १०० ते १५० रुपये, पूजेसाठी लागणारे बेल पान, तुळस, दुर्वा १० ते २० रुपये जुडीप्रमाणे विकले जात आहे.
तर मार्केटमध्ये फुलांचे भाव पिवळा झेंडू भगवा झेंडू १०० रु. आपट्याची पाने १० ते २० रु. करडू फुले १० ते २०रु. आंब्याची पाने २० ते ३० रु. भाताच्या लोंब्या २० ते ३० रु. गुलाब २० रूपये एक नग, कमळ २० एक नग, पिवळा अष्टर, जांभळी अष्टर १५० ते २०० रूपये, गजरा २० रु. एक वेणी ४० रु. या प्रमाणे आहे.
२० ते५० टक्क्यांनी फुल दरात वाढ पावसामुळे फुलांचे नुकसान झाले असून बाजारात आवक घटली आहे. तर, काही ठिकाणी माल खराब होत आहे. परिणामी, फुलांच्या दरात वीस ते पन्नास टक्क्यांची वाढ झाली असल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले. एकूणच पुर्ण बाजारपेठ सोन्यांनी (आपटयाच्या पानांनी) फुललेली व सजलेली दिसत होती.