पेण ः- प्रतिनिधी
पेण बोरगाव आदिवासी हद्दीतील कविता सुरेश पवार , वय 13 वर्ष 10 महिने ही 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 च्या दरम्यान ठिकाण बोरगाव आदिवासी वाडी येथुन बेपत्ता झाल्याची फिर्याद पेण पोलीस ठाण्यात त्यांच्या नातेवाईकांनी दिनांक 8 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता नोंदवली असून गुन्हा रजिस्टर नं. 91/2025 कलम 137(2)नुसार गुन्हा नोंद झाला आहे. या फिर्यादीमध्ये वर्णन केल्यानुसार कविता सुरेश पवार वय 13 वर्ष 10 महिने, रा. बोरगाव आदिवासीवाडी ता.पेण जि.रायगड, उंचीने 4 फुट 2 इंच, रंगाने गोरी, अंगाने सडपातळ, चेहरा उभा, केस काळे नाक सरळ, अंगात निळया रंगाचा फुळाफुळांचा टॉप, व काळया रंगाची लेगीज, पायात चप्पल सोबत निळया काळया रंगाची कपडयाची बॅग असल्याचे सांगितले आहे. तरी सदर वर्णनाची मुलगी कुठे आढळल्यास पेण पोलीस ठाणे फोन नं. 02143 252066 या दुरध्वनीवर संपर्क करून हरवलेल्या मुलीची माहिती देण्याचे आवाहन पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
