देशद्रोही मोसिन मुजावरला अटक

Crime

पेण ः प्रतिनिधी
बोरिवली येथील मोसिन मुजावर यानी आपल्या पेणच्या वर्ग मित्र आयुष शहाबरोबर चॅटींग करताना देशाविरुध्द वक्तव्य केले होते. त्यामुळे पेणमध्ये शांतता व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येउन मोसिनविरुध्द निषेध मोर्चा काढला होता. व त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्याचप्रमाणे पेण तालुका मुस्लिम समाजाने देखील मोसिन याचा निषेध करत त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येउन मोसिन याचा निषेध केला. व पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या होत्या. देशद्रोही मोसिन मुजावर मुळे पेणमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पेण पोलीस ठाण्याने समय सुचकता दाखवत पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक समद बेग यांच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाने मोसिन मुजावर याला नवी मुंबई येथील तुर्भे येथील रेल्वे स्टेशनवर सोमवारी पहाटे अटक केले. या पथकामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अजिंक्य म्हात्रे, अमोल म्हात्रे, सुशांत भोईर, संतोष जाधव, राजा पाटील, प्रकाश कोकर, सचिन वासकोटी, गोविंद तलवरे यांच्या अथक प्रयत्नामुळे मोसिन मुजावर पोलीसांच्या ताब्यात आला.