काशिनाथ पाटील यांचा 66 वा वाढदिवस उत्साहात साजरा

Raigad

पेण ः प्रतिनिधी
जोहे ग्रामपंचायतीमध्ये सलग सात वेळा निवडून येउन एक वेगळा आपला ठसा उमटविणारा संघर्ष योध्दा काशिनाथ पाटील यांचा 66 वा वाढदिवस त्यांच्या दोन्ही लेकी भाग्यश्री आणि मनाली यांनी वडीलांना सरप्राईज गिफ्ट म्हणून त्यांच्या नकळत प्लॅन करुन त्यांच्या मित्र परिवाराला बोलवून साजरा करण्याचे ठरविले आणि तो रवीराज  फार्महाऊस  पेण येथे साजरा करण्यात आला. काशिनाथ पाटील यांनी आजपर्यंत सेझविरुध्द लढा, गेल कंपनी विरुध्द लढा, अर्बन बँक बचाव लढा, खारेपाटाला पाणी मिळण्यासाठी संघर्ष यात्रेसाठी अग्रेसर, बाळगंगा धरण वासियांच्या पूनर्वसनासाठी संघर्ष, हमरापूर फाटयावर हमरापूर विभागासाठी बायपास मिळण्यासाठी उपोषण व लढा यांसह अनेक लढयांमध्ये या संघर्ष योध्दयाने सहभाग घेतला असून प्राध्यापक एन.डी.पाटील व मा. मंत्री भाई मोहनराव पाटील हे त्यांचे आदर्श आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा ऍड निलीमा पाटील, जिल्हा परिषदेचे मा. सभापती डी.बी.पाटील, जिल्हा परिषदचे मा सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरी ओम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर, मा. सभापती परशुराम पाटील, सुरेश पाटील, पेण तालुका भाजप अध्यक्ष संजय डंगर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, नगरसेविका सुनिता जोशी, नगरसेवक संतोष पाटील, कांदळे पाडा सरपंच मुरलीधर भोईर, कळवे सरपंच कमलाकर मोकल, अंतोरे सरपंच अमित पाटील, मसद सरपंच हरिश्र्चंद्र पाटील, दिव सरपंच विवेक म्हात्रे, उदयोजक हर्षल पितळे, उमेश पवार, युवा नेते चंद्रकांत खंडू पाटील, शेतकरी कामगार तालुका चिटणीस प्रल्हाद पाटील, काळेश्री सरपंच महेश ठाकूर, उदयोजक शशी भगत यांसह काशिनाथ पाटील यांचा परिवार आणि मित्र परिवार मोठया संख्येने हजर होता.