ग्रामस्थांच्या शिवसेना नेत्याविरुध्द प्रतिक्रिया
पेण ः प्रतिनिधी
शिहु बोरावाडी रस्ता गेली कित्येक वर्ष रखडलेला हा रस्ता नादुरुस्त होता यामुळे सर्व नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असे. हि सर्व बाब लक्षात घेता माजी कॅबिनेट मंत्री तथा पेण पाली सुधागड रोहा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री. रवीशेठ पाटील यांनी पाठपुुरावा करून 3.90 किमी अंतर असलेले कॉंक्रिट रस्त्यासाठी 6 सहा कोटी पस्तीस लाख रुपये मंजूर करून घेतले आणि त्याची वर्क ऑर्डर पण निघाली लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्णत्वास येईल तात्काळ सध्या रस्ता डागडुजी करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना आमदारानी दिल्या आहेत. बोरावाडी शीहू भागातील आलेल्या कार्यकर्त्यांनी आमदारांचे मनापासून आभार मानले आणि आमदारांजवळ आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत कळत नकळत शिवसेनच्या संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांचा खरपूस समाचार घेत सांगितले साहेब तुमच्या शिवाय विकासकामांना गती नाही. अनेक जन फक्त आश्वासने देऊन गेले त्यांच्या स्वार्थापोटी पण प्रत्यक्षात काम आपण करून दाखवलेत त्यामुळे भर भरभरून आपले आभार मानतो अश्या भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मुखातून निघाल्या. यावेळी युवा नेते श्री ललित पाटील, शीहु गावातील भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष वसंत मोकल, शिहू बोरावाडी येथील कार्यकर्ते रवींद्र लेंडी, दिलीप लेंडी, सीताराम ठोंबरे, पांडूरंग लोभी, देवराम लोभर, नामदेव, लेंडी, गोविंद पारधी, तुकाराम गडखर, परशुराम गडखर, जीवन लेंडी, प्रभाकर लेंडी, यशवंत लेंडी, अंबाजी पारधी, प्रकाश लेंडी, धावजी लेंडी, मधुकर लेंडी, भास्कर लेंडी, शंकर लेंडी, हितेश लेंडी, नरेश लेंडी, वसंत गडखर, देवराम पारधी, मच्छिंद्र लेंडी, जनार्दन गडखर, अमित लेंडी, गणपत गडखर, नामदेव लेंडी, धर्मा ेलेंडी, चंद्रकांत लेंडी, लक्षण लोभी, राजू ठोंबरे, नरेश ठोंबरे,..आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
