जिथे असते एकी, तिथे नक्कीच असते नेकी :- प्रसाद पांढरे
पेण:प्रतिनिधी
पेण सराङ्ग सुर्वणकार असोसिएशन मार्ङ्गत राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील आणि पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या जाहिर सत्काराचा कार्यक्रम पेण येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, सोनाराच्या व्यवसायात आल्याशिवाय सोनारांचे दुःख काय आहे हे समजत नाही. खरं तर सोन्याचा व्यापारी कष्ट करून जगतो हे बाहेर कुणाला सांगितले तर पटणार नाही. मात्र त्यांना ही कष्ट करून जगावं लागत हे सत्य आहे. कोणाता ही व्यवसाय बिनाकष्टाचा होउ शकत नाही. आम्हा लोकप्रतिनिधींच ज्या प्रमाणे इतर व्यवसायीकांना संरक्षण देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे व्यापारी म्हणून सर्वोच्च टोक असणारा सोनार व्यवसायाला संरक्षण देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे संघटना ही महत्त्वाची आहे आणि तुमची संघटना एकजुट आहे हे आज तुमच्या एकीवरून समजते. आज जो आमचा तुम्ही सत्कार केलात तो सत्कार कौटुंबीक सत्कार आहे असे समजतो आणि भविष्यात तुमच्या अडीअडचणीला आम्ही दोघे सर्वोत्वपरी उभे असणार असा शब्द देतो. यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून सोनार असोसिएशनचे अध्यक्ष हरिओम यांचे कौतुक करत एक खंबीर नेतृत्व आपल्या असोसिएशनचा आहे. त्यामुळे नक्कीच तुमचे असोसिएशन एकजुट आहे. त्यामुळे सदैव आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर सराङ्ग सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर म्हात्रे तथा हरीओम यांनी आपल्या मनोगतात सोनारांच्या व्यथा मांडल्या व शासनामार्ङ्गत काय करणे गरजेचे आहे. जेणेकरून सोनारांना त्रास होणार नाही. या बाबत आपली कैङ्गियत खासदार आणि आमदारांना सांगितली तर सराङ्ग सुवर्णकार असोसिएशनचे खजिनदार कन्हैयालाल पुनमिया यांनी आपल्या मनोगतात आपण व्यवसाय करत असताना लहान मोठयांचा आर्शिवाद कसा गरजेचा आहे या विषयी वक्तव्य केले.
तर यावेळी पेण विधानसभेचे आमदार रविशेठ पाटील आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांना शाल, श्रीङ्गळ आणि भेटवस्तु देउन त्यांचे जाहिर सत्कार केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक अशोक जैन तर आभार रुपेश वेदक यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पेण तालुक्यातील सराङ्ग सुवर्णकार असोसिएशनचे सर्व सदस्य हजर होते.
