पेण नगरपालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका विदयार्थ्यांना

Raigad

पेणःप्रतिनिधी
पेण नगरपालिकेत गेली 4 वर्ष प्रशासक असल्याने अधिकारी वर्ग बेजबाबदार झाले आहेत. पेण एज्युकेशन सोसायटीच्या पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर अडिच ते तीन फुट पाणी साचले आहे. याचा फटका सर्वस्वी विदयार्थ्यांना बसत आहे.
पेण नगरपालिकेने नुकतेच पेण नगरपालिकेच्या वरच्या मैदानाला भराव टाकून सिमेंटने बांधकाम केले आहे. मात्र हे करत असताना बांधकाम अभियंत्यांना हे का सुचले नाही की, पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रवेशद्वारा समोर खड्डा आहे. या खड्डयात पाणी साचू शकेल. त्यामुळे गटार व्यवस्था करणे गरजेचे आहे. पहिल्या पावसातच मोठया प्रमाणात या ठिकाणी पाणी साचले होते त्यावेळेला पेण एज्युकेशन सोसायटी व प्रसार माध्यमांनी नगरपालिकेला सुचित केले होते की, गटार व्यवस्था तातडीने करा अन्यथा शाळा सुरू झाल्यावर विदयार्थ्यांचे हाल होतील. परंतु पेण नगरपालिकेने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. शाळा सुरू होउन दोन दिवसच उलटले आहेत आणि आज पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा प्रवेशद्वारावर पाणी साचले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन दिवसापूर्वी पेण नगरपालिकेने ब्रेकर लावला परंतु ज्या ठिकाणाहुन गटार व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी एक अनधिकृत टपरी आहे आणि त्या टपरिला पेण नगरपालिका एक प्रकारे अभय देत आहे. त्यामुळे ब्रेकरने काम करणे शक्य नाही. अनधिकृत टपरी धारकाला विदयुत महावितरण कंपनीने सुध्दा 10 हजार रूपये घेउन विज कनेक्शन दिला आहे. एकीकडे सर्व सामान्यांना विज कनेक्शन घ्यायला हेलपाटे घालावे लागतात. परंतु अवैधरित्या लक्ष्मीदर्शन दिल्यावर सहज काही बाबी शक्य होतात. याच हे जिवंत उदाहरण आहे.
ज्या वेळेला मैदानाचे काम केले त्यावेळेला बांधकाम अभियंत्यांनी केलेल्या चुकीमुळे आता गटार व्यवस्था केल्यास एक ते दिड वर्षापुर्वी लावलेले पाम वृक्ष काढावे लागतील. तसेच काही पाम वृक्ष आता जात असणार्‍या पाण्यामुळे कोलमडून पडलेली आहेत. तर येत्या दोन दिवसात पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रवेशद्वारा वरची ही समस्या सुटली नाही तर पेण एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळ व पालक वर्ग नगरपालिकेवर धडकतील. असे पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड.मंगेश नेने यांनी गर्जा रायगड साद संवादशी बोलताना सांगितले. तर गर्जा रायगडच्या संपादकांनी घटनास्थळी जाउन ग्राउंड रिपोर्ट घेतला.